दापोरा येथील तरुणाचा नाशिक येथे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST2021-08-28T04:22:03+5:302021-08-28T04:22:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क दापोरा, ता.जळगाव : दापोरा येथील रहिवासी तुषार रघुनाथ काळे या तरुणाचा नाशिक येथे प्राणघातक हल्ल्यात ...

Young man from Dapora dies in Nashik | दापोरा येथील तरुणाचा नाशिक येथे मृत्यू

दापोरा येथील तरुणाचा नाशिक येथे मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

दापोरा, ता.जळगाव : दापोरा येथील रहिवासी तुषार रघुनाथ काळे या तरुणाचा नाशिक येथे प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणातील संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे.

तुषार काळे हा तरुण आपल्या कुटुंबासह नाशिक येथे गेल्या सहा वर्षांपासून वास्तव्यास होता. तो चहा टपरी चालविण्याचा व्यवसाय करीत होता.

२६ रोजी सायंकाळी नाशिकच्या म्हसरूड भागातील रासबिहारी लिंक रोड लगतच्या चहाच्या टपरीवर संशयित आकाश काळेने तुषारच्या डाव्या मांडीत चाकू मारला. टपरी लावण्याच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचे समजते. दरम्यान, हल्ल्यानंतर तुषारला खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दापोरा येथे अंत्यसंस्कार

तुषारवर दापोरा येथे २७ रोजी संध्याकाळी ४ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आई, वडील असा परिवार आहे.

Web Title: Young man from Dapora dies in Nashik