दापोरा येथील तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:16 IST2021-03-31T04:16:15+5:302021-03-31T04:16:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बाहेर फिरून येतो असे सांगून घरातून निघालेल्या विशाल शांताराम पवार (वय २७, रा. ...

Young man from Dapora commits suicide under running train | दापोरा येथील तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

दापोरा येथील तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बाहेर फिरून येतो असे सांगून घरातून निघालेल्या विशाल शांताराम पवार (वय २७, रा. दापोरा, ता.जळगाव) या तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिरसोली शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी की, विशाल शांताराम पवार हा तरुण आई व बहिणीसह दापोरा येथे वास्तव्यास होता. शिक्षणासह आईसोबत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जबाजारीपणामुळे तो तणावात होता. दरम्यान, २९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता बाहेर जावून येतो असे सांगून दुचाकीने घराबाहेर पडला. शिरसोली व दापोरा दरम्यानच्या परिसरात दुचाकी लावून त्याने धावत्‍या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. गँगमन पांडे यांनी तत्काळ रेल्वे स्टेशन मास्तर यांना सांगितले. घटनास्थळी तालुका आणि एमआयडीसी पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली. मयताच्या खिश्यातील कागदपत्रांमुळे ओळख पटली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Web Title: Young man from Dapora commits suicide under running train