शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

पत्नी पळाली, दलालीचे १ लाखही बुडाल्याने तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 21:47 IST

दलालाकडून फसवणूक

जळगाव : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नी पळाली. लग्न जोडण्यासाठी महिला दलालांनी घेतलेले एक लाख रुपयेही परत मिळत नसल्याच्या संतापात कैलास संतोष चवरे (रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणात दलाल लिलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी (रा.शनी पेठ) व संगीताबाई रोहीदास भालेराव (३७, हॅपी होम कॉलनी) या दोघांना शनी पेठ पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. ७ आॅगस्ट रोजी कैलास याचा मृत्यू झाला होता.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कैलास या तरुणाचे सात वर्षापूर्वी लग्न झाले होते. चार वर्षापूर्वी पत्नीशी घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे. समाजात मुलींची कमतरता असल्याने मुली मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे मेहुणा संतोष रघुनाथ पाटील (रा. कुसुंबा, ता. जळगाव) हे कुसुंबा येथे राहणाºया कल्पनाबाई यांच्यामार्फत शनी पेठेतील लिलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी यांच्याकडे गेले. लिलाबाई हिने विवाह संबंध जोडणारी उज्ज्वला उर्फ संगीता ही मलकापूरला माझी ओळखीची असून तिच्याकडे मुली असल्याचे सांगितले.त्यानुसार कैलास, त्याचा मेहुणा संतोष व इतर नातेवाईक मलकापूर येथे मुलगी पाहण्यासाठी गेले. तेथे मुलगी पसंत पडली, मात्र नंतर मुलाचे दुसरे लग्न असल्याने तिने लग्नास नकार दिला. त्यामुळे या दलाल महिलेने दुसरी मुलगी दाखविली, परंतु त्यासाठी १ लाख रुपये लागतील म्हणून सांगितले. मुलगी पसंत झाल्यानंतर जागेवरच ४० हजार रुपये देण्यात आले व त्याच दिवशी तेथे एकमेकाच्या गळ्यात माळ टाकून कैलास व मुलीचे लग्न लावण्यात आले. त्यानंतर सर्वजण घरी आले असता कुसंबा येथे लिलाबाई जोशी हिला ६० हजार रुपये देण्यात आले. ३० जुलै २०२० रोजी विवाह व पैशाचा व्यवहार झाला.खोट्या नावाचा वापरलग्न लावून देण्याच्या प्रकरणांमध्ये दलालांकडून खोट्या नावाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. संगीता भालेराव हिने पद्मा सुधाकर खिल्लारे, संगीता रोहीदास भालेराव, संगीता रमेश पाटील, व संगीता संतोष पाटील अशा नावांचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यात नववधू व लिलाबाई जोशी या दोघांना अटक झालेली नाही.दुसºया दिवशी मोबाईल घेऊन पलायनदुसºया दिवशी ३१ रोजी ११.३० वाजता नववधू कैलासचा मोबाईल घेऊन घरातून पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे कैलास व संतोष असे दोघंजण १ आॅगस्ट रोजी लिलाबाई हिच्याकडे गेले. मुलगी पळून गेली, त्यामुळे आमचे एक लाख रुपये परत कर, अशी मागणी त्यांनी केली असता लिलाबाई हिने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर पैसे दिले नाही तर मी जीवाचे बरे वाईट करुन घेईल, अशी धमकी कैलास याने दिली. परंतु तरीही लिलाबाई हिने पैसे परत केले नाहीत. ३ रोजी कैलास याने ‘पत्नी पळाली, १ लाख रुपये पण गेले’ असे म्हणत संतापात शनी पेठेत शनी मंदिराकडे विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबाने कैलास याला दवाखान्यात दाखल केले. तेथे ७ आॅगस्ट रोजी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हादरम्यान, या घटनेनंतर संताष रघुनाथ पाटील यांनी शनी पेठ पोलीस स्टेशन गाठून नववधू, दलाल लिलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी (रा. शनी पेठ) व संगीताबाई रोहीदास भालेराव यांच्याविरुध्द तक्रार दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, संगीता हिला रविवारी पोलिसांनी अटक केली. सोमवारी दलाल लिलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी हिला अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघींचीही कारागृहात रवानगी केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेशसिंग पाटील, सलीम पिंजारी, रवींद्र पाटील, परीस जाधव, अभिजित सैंदाणे, अनिल कांबळे, राहूल पाटील, राहूल घेटे व धनंजय येवले करीत आहेत.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव