चंद्रभान पाटील, निपाणे ( जि जळगाव) : सासरच्या लोकांकडून होणारा पैशांचा तगादा आणि धमकी सहन झाल्याने भातखेडा ता. एरंडोल येथील तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी सासू, साडूसह तीन जणांविरुद्ध कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव ज्ञानेश्वर बडगुजर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा विवाह धुळे येथील संजय भगवान बडगुजर यांची मुलगी दीपाली हिच्याशी ११ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी सासू अनिता बडगुजर, साडू भटू गरुड आणि साली गौरी गरुड (रा.धुळे) हे तीन जण पैसे द्यावेत म्हणून गौरव याच्या मागे लागले होते. वेळप्रसंगी त्याला शिवीगाळ आणि धमकी दिली जात होती. पैशाच्या नेहमी होणाऱ्या या तगाद्याला कंटाळून गौरव याने २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घरात कोणी नसताना आत्महत्या केली.
याबाबत गौरवचे वडील आणि भातखेडे येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर पुंडलीक बडगुजर यांनी कासोदा पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून २ मार्च रोजी सायंकाळी वरील तीनही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : Harassed for money, a young man from Bhatkheda committed suicide. In-laws allegedly pressured him for funds, leading to the tragic act. Police filed a case against the mother-in-law and two others.
Web Summary : पैसे के लिए ससुराल वालों की प्रताड़ना से तंग आकर भातखेड़ा के एक युवक ने आत्महत्या कर ली। पुलिस ने सास और दो अन्य के खिलाफ मामला दर्ज किया है। पैसों के दबाव के चलते युवक ने यह कदम उठाया।