दसऱ्यानिमित्त मुलांना नवीन कपडे घेतल्याच्या दुस-याच दिवशी तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 16:45 IST2019-10-09T16:44:53+5:302019-10-09T16:45:00+5:30
चिंचपुरा भागात ज्ञानेश्वर अशोक नाथजोगी (३५) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजता घडली.

दसऱ्यानिमित्त मुलांना नवीन कपडे घेतल्याच्या दुस-याच दिवशी तरुणाची आत्महत्या
जळगाव : पिंप्राळा भागातील चिंचपुरा भागात ज्ञानेश्वर अशोक नाथजोगी (३५) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजता घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर हा वडील अशोक तुकाराम नाथजोगी, आई मंगलबाई, पत्नी मंजुळाबाई, मुलगी तेजस्विनी (१२), मुलगी पूर्वा (५)व मुलगा पार्थ (२) यांच्यासोबत वास्तव्याला होता. बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होता. मंगळवारी दसरा सण असल्यानेमुलांना नवे कपडे आणून सायंकाळी हा सण कुटुंबीयांसमवेत साजरा केला.
बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेला होता, मात्र दुपारी दीड वाजेच्या पूर्वी राहत्या घरी त्याने गळफास घेतल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. तातडीने जिल्ह रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाºयांनी ज्ञानेश्वरला मृत घोषीत केले. रामानंदनगर पोलीस स्टेशनचे हेडकॉन्सटेबल अनिल फेगडे तसेच पोलीस कॉन्सटेबल सुभाष सोनवणे यांनी पंचमाना केला.