पारोळा तालुक्यातील मुंदाणे येथे तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 18:02 IST2020-04-05T18:02:01+5:302020-04-05T18:02:54+5:30
मुंदाणे प्र. अ. येथील एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पारोळा तालुक्यातील मुंदाणे येथे तरुणाची आत्महत्या
पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील मुंदाणे प्र. अ. येथील एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ रोजी सकाळी नऊला घडली. निखिल संजय संदानशिव असे त्याचे नाव आहे.
निखिलने त्याच्या राहत्या घरात पंख्याच्या कडीला साडी बांधून गळफास घेतला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यास खासगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे यांनी तपासून तो मयत असल्याचे घोषित केले. याबाबत मयत निखिलचे काका आबा जगन्नाथ संदानशिव रा.मुंदाणे यांनी पारोळा पोलिसात खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तपास हेडकॉन्स्टेबल जयवंत पाटील करीत आहेत.