जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथे तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 16:52 IST2019-07-30T16:50:16+5:302019-07-30T16:52:11+5:30
गंगापुरी, ता.जामनेर येथील दीपक भिका मोरे याने सोमवारी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले.

जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथे तरुणाची आत्महत्या
ठळक मुद्देघरी कोणी नसताना घेतला गळफासआत्महत्येचे कारण अज्ञात
जामनेर, जि.जळगाव : गंगापुरी, ता.जामनेर येथील दीपक भिका मोरे (२७) याने सोमवारी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले.
त्याची पत्नी मुलांसह माहेरी गेली होती आणि आई-वडील गारखेडे येथे गेले होते. रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी दीपकचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणला. डॉ.हर्षल चांदा यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दीपकला एक मुलगा व मुलगी आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.