नेरी येथे तरुणाची दिवाळीच्या दिवशीच आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 12:37 IST2019-10-29T12:36:52+5:302019-10-29T12:37:22+5:30

कारण अस्पष्ट

Young girl commits suicide on Diwali day in Neri | नेरी येथे तरुणाची दिवाळीच्या दिवशीच आत्महत्या

नेरी येथे तरुणाची दिवाळीच्या दिवशीच आत्महत्या

नेरी, जि. जळगाव : येथील रहिवासी नरेंद्र ज्ञानेश्वर ठाकरे (वय २४) या तरुणाने रविवारी दिवाळीच्या दिवशी रात्री उशिरा आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसून नरेंद्र हा अविवाहीत होता. तो येथील आपल्या घरात आजी सोबत राहत होता अशी माहिती मिळाली. सोमवारी जामनेरच्या उप जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
आपल्या राहत्या घरातील छताला असलेल्या पंख्याला दोर बांधून गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे आई वडील यांचेदेखील काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. त्याच्या पश्चात आजी व एक लहान भाऊ आहे. कामानिमित्त तो बाहेर गावी असतो सदर घटना ऐन दिवाळीच्या दिवशी घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Young girl commits suicide on Diwali day in Neri

टॅग्स :Jalgaonजळगाव