आजाराला कंटाळून तरूणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:14 IST2019-07-23T12:14:07+5:302019-07-23T12:14:30+5:30

गेंदालाल मिल येथील घटना

Young girl commits suicide after suffering illness | आजाराला कंटाळून तरूणाची आत्महत्या

आजाराला कंटाळून तरूणाची आत्महत्या

जळगाव : आजाराला कंटाळून गेंदालाल मिल परिसरातील विकास सुदाम मोरे (४०) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली़
विकास हे पत्नी कविता, मुलगा सौरभ व मुलगी विद्या यांच्यासह गेंदालाल मिल परिसरात वास्तव्यास होते़ ते हातमजुरी करायचे तर पत्नी देखील मजुरी करून घराचा उदरनिर्वाह करित आहे़ सोमवारी दोन्ही मुले ही शाळेत गेली होती तर पत्नी कविता या सुध्दा कामाला गेल्या होत्या़ त्यामुळे विकास हे घरी एकटेच होते़ दुपारच्या सुमारास घराच्या छताला रूमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन विकासने आत्महत्या केली़
पायाच्या आजारापासून त्रस्त
विकास हे काही दिवसांपासून पायाला नेहमी सूज येत असल्यामुळे घरीच होता़ या आजाराला ते कंटाळले होते़ त्यातूनच आत्महत्या केली असावी, असे नातेवाईकांचे म्हणणे होते़
खेळणाऱ्या मुलांच्या लक्षात आली घटना
विकास याने गळफास घेतल्यानंतर घराजवळ काही लहान मुले ही खेळत होती़ त्यातील एका मुलाला गळफास घेतल्याचा प्रकार दिसला़ त्यांनी त्वरित गल्लीतील नागरिकांना सांगितले़ त्यानंतर याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी घेऊन पंचनामा केला़

Web Title: Young girl commits suicide after suffering illness

टॅग्स :Jalgaonजळगाव