पाल येथे तरूण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 23:58 IST2019-12-10T23:50:33+5:302019-12-10T23:58:15+5:30
सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या हरेश करणसिंग पवार या शेतकºयाने आत्महत्या केली.

पाल येथे तरूण शेतकऱ्याची आत्महत्या
पाल, ता.रावेर, जि.जळगाव : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून हरेश करणसिंग पवार (वय ३३) या तरुण शेतकºयाने आत्महत्या केली. १० रोजी रात्री नऊला ही घटना घडली.
राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांना स्वत:ला संपविले. त्यांची दोन एकर जमीन आहे. त्यांच्यावर कर्ज असून, जमिनीतून उत्पन्न अल्पसे मिळत होते. यातून घरखर्च भागत नव्हता. यातूनच निराशेने आपले जीवन संपविले.
गेल्या तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत नाही. यंदा तर ओला दुष्काळ अशी विपरित परिस्थिती निर्माण झाली. कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होेते. यातूनच त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले, असे सांगण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी तसेच आई-वडील व दोन भाऊ आहेत. मुलगा जिल्हा परिषद मराठी शालेत पहिलीत शिकत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.