बापाला अटक झाल्याने तरूण मुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 22:00 IST2020-03-05T22:00:44+5:302020-03-05T22:00:51+5:30
रावेरची घटना : दोन महिन्यावर होता विवाह

बापाला अटक झाल्याने तरूण मुलाची आत्महत्या
रावेर : बापाला चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली म्हणून एकूलता एक असलेल्या मुुर्तीकार मुलाने बदनामीच्या धाकाने गुरुवारी रावेर रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेगाडीखाली आत्ममहत्या केल्याची दुदैर्वी घटना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
वृत्त असे की, शहरातील बंडूचौक भागातील कुंभारवाड्यात प्रकाश सिताराम कुंभार यांच्या घरातून ४ रोजी मध्यरात्री ३९ हजार ८०० चा मुद्देमाल अज्ञात लंपास केला. दरम्यान, फैजपूर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, पो हे कॉ सतीश सानप, पो कॉ तुषार मोरे यांनी संशयीत आरोपी म्हणून रवींद्र नारायण कुंभार (वय ३६) रा कुंभारवाडा, रावेर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिल्याने रावेर पोलिसांनी त्यास अटक केली. दरम्यान, आरोपी रवींद्र नारायण कुंभार यांचा एकूलता एक मुलगा मयूर रवींद्र प्रजापती (वय २२) याचा मामाच्या मुलीशी नियोजित विवाह अवघ्या दोन महिन्यांवर असताना बापाला चोरीच्या आरोपावरून अटक झाल्याची बदनामी त्याला अस्वस्थ करणारी ठरली. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.