रावेरमध्ये विविध संस्थांतर्फे योग दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST2021-06-23T04:11:38+5:302021-06-23T04:11:38+5:30

श्रीराम मॅक्रेव्हिजन स्कूलमध्ये योगप्रशिक्षक एन.एस. वैद्य व ९७ वर्षीय योगसाधनेचे योगीया रामभाऊ पाटील यांचा उद्योजक श्रीराम पाटील व पोलीस ...

Yoga Day by various organizations in Raver | रावेरमध्ये विविध संस्थांतर्फे योग दिन

रावेरमध्ये विविध संस्थांतर्फे योग दिन

श्रीराम मॅक्रेव्हिजन स्कूलमध्ये योगप्रशिक्षक एन.एस. वैद्य व ९७ वर्षीय योगसाधनेचे योगीया रामभाऊ पाटील यांचा उद्योजक श्रीराम पाटील व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या हस्ते हृद्य सत्कार करून योगासनांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

प्राकृतिक वैद्य डॉ. नीलेश चंदेलवाल व युवराज महाजन यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवले. यात जि.प.चे माजी सभापती सुरेश धनके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदू महाजन, पद्माकर महाजन, राजन लासुरकर, पं.स. सभापती कविता कोळी, प्रल्हाद पाटील, पं.स. सदस्य जितेंद्र पाटील, दिलीप पाटील, हरीलाल कोळी, सी.एस. पाटील, अमोल पाटील, उमेश महाजन कांतीलाल बुआ, फकिरा महाजन, नितीन पाटील, नितीन महाजन, बाळकृष्ण महाजन, अविनाश जाधव, मनोज श्रावक, रवी पाटील, अजिंक्य वाणी, बाळा आमोदकर, डॉ. मिलिंद वानखेडे, डॉ. रणजीत पाटील, डॉ. रवींद्र वानखेडे, माजी नगरसेवक अनिल अग्रवाल, संतोष अग्रवाल, मोतीलाल खटवाणी, महेश खटवाणी, अशोक पाटील, अजय पाटील, रुधेश पाटील, मेघा भागवत, जयंत भागवत व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Yoga Day by various organizations in Raver