यावलचे आर.के. पवार यांचा उत्कृष्ट नायब तहसीलदार सन्मानपत्राने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 17:11 IST2019-08-04T17:10:55+5:302019-08-04T17:11:21+5:30
यावल येथील नायब तहसीलदार आर.के. पवार यांचा उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून सन्मान करण्यात आला.

यावलचे आर.के. पवार यांचा उत्कृष्ट नायब तहसीलदार सन्मानपत्राने गौरव
चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : यावल येथील नायब तहसीलदार आर.के. पवार यांचा फैजपूर विभागातून उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून सन्मान करण्यात आला.
यावल येथे गेल्या सहा महिन्यांच्या अल्प कालावधीत तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शेतकरी व जनसामान्यांच्या कामाला अधिक प्राधान्य देवून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक लागणारे विविध दाखले त्याचबरोबर तालुक्यात वाळू तस्करीस पायबंद घालण्यासाठी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कारवाई यात पवार यांनी आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटवल्याने रावेर येथे महसूल दिनी प्रांताधिकारी , यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर, रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे त्याचबरोबर रावेर व यावल विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी तसेच महसूल कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पवार यांचा उत्कृष्ठ नायब तहसीलदार या सन्मानपत्राद्वारे गौरविण्यात आले.
यावल तहसील कार्यालयात पवार यांचा संगायोचे अध्यक्ष विलास चौधरी, भाजपचे पदाधिकारी उज्जैनसिंग राजपूत, राजू कवडीवाले, शेखर पटेल, पराग सराफ, अरूण पाटील, ज्ञानदेव मराठे, तेजस यावलकर, अय्युब पटेल, सुनील गावडे यांनी व तहसीलचे कर्मचारी उपस्थित होते.