यावलमध्ये छर्याच्या बंदुकीसह युवक पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 18:36 IST2017-12-23T18:32:48+5:302017-12-23T18:36:46+5:30
यावल पोलिसांची मध्यरात्री कारवाई

यावलमध्ये छर्याच्या बंदुकीसह युवक पोलिसांच्या ताब्यात
आॅनलाईन लोकमत
यावल : पिस्तूल बाळगल्याच्या आरोपावरुन यावल पोलिसांनी शनिवारी एका युवकास ताब्यात घेतले. मात्र तपासणीत ती साधी छर्रे उडविणारी पिस्तूल असल्याचे निष्पन्न झाले. एका युवकाकडे पिस्तूल असल्याची गुप्त माहिती शुक्रवारी रात्री पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी रात्री सव्वादहाच्या सुमारास दखल घेत पथक तयार केले. गोरख पाटील व अन्य सहकाºयांसमवेत युवकाचे घर गाठले. युवकास झोपेतून उठवण्यात आले. त्यास पिस्तुलासह पोलीस ठाण्यात आणण्यात आले तो पर्यंत शहरात पिस्तूल सापडल्याची चर्चा पोहचली. अनेकांनी रात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र ती पिस्तूल छºयांची (साधी ) निघाली. पोलिसांना मिळालेल्या बातमीवरून पोलीसांनी मात्र लगेच दखल घेत तत्परता दाखविली. भुसावळातील गोळीबार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.