शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
2
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
3
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
4
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
5
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
6
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
7
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
8
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
9
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
10
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
11
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
12
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
13
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
14
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
15
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
16
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."
17
कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
18
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ
19
बॉबी देओलने खरेदी केली शानदार रेंज रोव्हर SUV, किंमत आहे कोटींच्या घरात, जाणून घ्या
20
“मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

बनावट दस्तावेज प्रकरणी भुसावळच्या नायब तहसीलदारास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 23:41 IST

नायब तहसीलदार शशिकांत जनार्दन इंगळे व लिपिक शाम तिवारी यांना अटक

भुसावळ जि. जळगाव: तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी व शिक्के तयार करुन भूखंडाच्या विक्रीस परस्पर परवानगी दिल्याचा प्रकार भुसावळात उघडकीस आला आहे. या प्रकरणी शासनाची फसवणूक केल्याने नायब तहसीलदार शशिकांत जनार्दन इंगळे व लिपिक शाम तिवारी यांना अटक करण्यात आली. रविवारी रात्री भुसावळ शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

जनकल्याण अर्बन पतसंस्थेचे विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी १० जणांना बेकायदेशीर प्लॉट विक्री केली. याप्रकरणी वसुली अधिकाऱ्यासह प्लॉट घेणारे १० जण अशा एकूण ११ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याबाबत  नायब तहसीलदार शोभा घुले यांनी फिर्याद दिली होती.  त्यावरुन रविवारी ही कारवाई करण्यात आली. या फसवणूक प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता तीन झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन आणखी काय सत्य बाहेर येतं, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावBhusawalभुसावळArrestअटक