संत मुक्ताई राम पालखीचे प्रातिनिधीक स्वरूपात पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:07+5:302021-06-25T04:14:07+5:30

जळगाव - श्री संत मुक्ताई राम पालखीचे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन करून वटपौर्णिमेस प्रस्थान झाले. हा कार्यक्रम हभप मंगेश महाराज ...

Worship of Saint Muktai Ram Palkhi in representative form | संत मुक्ताई राम पालखीचे प्रातिनिधीक स्वरूपात पूजन

संत मुक्ताई राम पालखीचे प्रातिनिधीक स्वरूपात पूजन

Next

जळगाव - श्री संत मुक्ताई राम पालखीचे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन करून वटपौर्णिमेस प्रस्थान झाले. हा कार्यक्रम हभप मंगेश महाराज यांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिरात पार पडला.

जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमाने दर वर्षाप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरिता श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा ही महाराष्ट्रातील मुक्ताईंची सर्वात जुनी पालखी जळगाव येथून निघत असते. यंदा कोरोना महामारीमुळे पालखी सोहळ्यास पायी जाण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे वटपौर्णिमेला श्रीराम मंदिरात प्रातिनिधिक स्वरूपामध्ये श्री संत मुक्ताईंचे पूजन विद्यमान गादीपती हभप मंगेश महाराज यांच्याहस्ते करून मंदिरातल्या मंदिरात मोजक्या वारकऱ्यांमध्ये पालखी दिंडी प्रस्थान सोहळा करण्यात आला. आषाढी एकादशी अगोदर शासकीय नियमानुसार मोजक्या वारकरी मंडळींसह पंढरपूर येथे वाहनाने प्रस्थान होईल. दोन महिने पालखी श्रीराम मंदिरात राहील. दररोज पहाटे ५ वाजता काकडा भजन, नंतर काकडारती पहाटे ५.१५ ते ७.३० वाजता प्रभू श्रीरामांचे व श्री संत मुक्ताईंचे पादुका अभिषेक होईल. सकाळी ८ वाजता मंदिरात दिंडी व भजन, दुपारी १२ वाजता महानैवेद्य तसेच आरती दुपारी ५ वाजता हरिपाठ, रामरक्षा, स्तोत्र पठण होईल.

Web Title: Worship of Saint Muktai Ram Palkhi in representative form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.