शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

पांढऱ्या सोन्याच्या तेजी-मंदीमुळे चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 6:33 PM

कुणाला भाववाढीचा फायदा तर कुणाला कमी भावाचा फटका

आडगाव, ता.चाळीसगाव : निसर्गाच्या अवकृपेने गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पूर्ण पाणी फिरले असताना कापसाच्या भावातील चढ-उताराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.चाळीसगाव तालुक्यातील त्यातच मन्याड परिसरातील शेतकºयांचे खरीपातील मुख्य पीक म्हणजे पांढरे सोने म्हणजेच कपाशी या पिकावरच शेतकºयांचे वर्षभराचे गणित अवलंबून असते. कपाशी पिकाने साथ दिली तरच लग्न समारंभ, विविध संस्थाचे कर्ज, इतर देणे-घेणे तसेच रब्बी हंगामाचा खर्च, गुरांचा चारा इत्यादी आर्थिक गणित हे कपाशीच्या उत्पन्नावरूनच सोडविले जाते. परंतु गेल्या खरीपात पर्जन्यमान कमी झाल्याने कपाशीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. एकरी १२ ते १५ क्वींटल पर्यंत उत्पन्न निघणारे ते यावर्षी फक्त पाच क्विंटलपर्यंतच आले ते ही ज्यांच्याकडे थोडेफार पाणी होते त्यांनाच हे शक्य झाले. कोरडवाहू शेतकºयांना तर काहीच हाती आले नाही.यावर्षी उत्पन्न कमी त्यामुळे कपाशी सुरूवातीपासून सहा हजाराच्या पुढे विकली जाईल असा अंदाच बांधून २५ टक्के शेतकºयांनी सुरुवातीलाच म्हणजे नोव्हेबर-डिसेंबरच्या कालावधीत ६००० ते ६ हजार १०० प्रती क्विंटल भावात कापूस विकला. ७५ टक्के शेतकºयांनी यंदा दुष्काळ आहे म्हणून कपाशीचे सर्वत्र उत्पन्न कमी आहे त्यामुळे आणखी भाव वाढतील या आशेवर कापूस साठवून ठेवला. मात्र नंतर हळूहळू भाव कमी होत गेले. ६००० ते ६१०० वरून थेट ५१०० ते ५२०० रूपयापर्यंत म्हणजे एक हजार प्रती क्विंटलने भाव खाली आले.जानेवारी महिन्यातील संक्रात सणानंतर भाव वाढतात हा दरवर्षाचा अनुभव लक्षात घेता १५ जानेवारीपासून ते १५ फेब्रुवारीपर्यंत भाव ५४०० पर्यंत स्थिर राहिले. फेब्रुवारी संपायला आला तरी भाव वाढण्याचे काहीही संकेत दिसत नव्हते. पुढे लोकसभेची निवडणूक येत आहे. आता काही भाव वाढणार नाही म्हणून जवळ-जवळ ५० टक्के शेतकºयांनी ५४०० च्या भावाने कापूस विकून टाकला.यात राहिले ते २५ टक्के मोठे बागायतदार शेतकरी. या शेतकºयांनी भविष्यकाळात कापसाचे बाजार भाव वाढतील या आशेवर कापूस साठवून ठेवल्यानंतर मार्च महिन्याच्या १८-१९ तारखेनंतर कापूस ५७०० ते ५८०० रुपये प्रती क्विंटल भाव झाले. १९ मार्च रोजी काही ठिकाणी खाजगी व्यापाºयांनी ६००० ते ६१०० रूपये पर्यंतने खरेदी केला. म्हणजेच ५० टक्के शेतकºयांना भाव कमीचा फटका बसला तर ५० टक्के शेतकºयांना भाववाढीचा फायदा झाला.यंदा उत्पन्नात मोठी घटदरवर्षा प्रमाणेच यावर्षीदेखील कपाशी पिकावर शेतकºयांनी हजारो रुपये खर्च केले होते. गेल्या खरीप हंगामात बोंड अळीच्या प्रार्दुभावाने कपाशीचे मोठे नुकसान झाले होते. परत बोंडअळी पडू नये म्हणून यावर्षी शेतकºयांनी सुरूवातीपासूनच दक्षता घेतली. परंतु यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने शेतकºयांच्या उत्पन्नात जवळ-जवळ मोठी घट झाली. उलट बोंडअळीच्या काळात शेतकºयांना चांगले उत्पन्न हाती आले होत, असेही काही कापूस उत्पादक सांगत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव