फैजपूर येथे कामगार मजुरांची घरपट्टी पाणीपट्टी माफ करा, हाताला काम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 07:53 PM2018-12-07T19:53:15+5:302018-12-07T19:54:18+5:30

कामगार, मजुरांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी या मागणीसाठी प्रांताधिकारी व मुख्याधिकाºयांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले.

Worker's laboratory in Phazpur, forgive the waterpot, give hand job to the hand | फैजपूर येथे कामगार मजुरांची घरपट्टी पाणीपट्टी माफ करा, हाताला काम द्या

फैजपूर येथे कामगार मजुरांची घरपट्टी पाणीपट्टी माफ करा, हाताला काम द्या

googlenewsNext
ठळक मुद्देप्रांताधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन२६ जानेवारीपासून उपोषणचा इशारा

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : कामगार, मजुरांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी या मागणीसाठी प्रांताधिकारी व मुख्याधिकाºयांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले.
शहरातील बांधकाम करणारा मिस्त्री व कामगार व बांधकाम व्यावसायावर संलग्न असलेल्या विविध कामगारवर्ग मोठ्या संख्येने राहत आहे. मात्र गेल्या वर्षांपासून यांच्यावर नोटबंदी, जीएसटी, सीएसटीमुळे लहान-मोठ्या उद्योगधंदे व बांधकाम व्यावसायावर मोठा विपरीत परिणाम झाल्याने हा कामगार वर्गावर हाताला काम नसल्याने तो उपासमारीची संकटाला सामोरा जात आहे. त्यातच शासनाचा वाळू उपसा व वाहतूक बंदी बडगा कंबरडे मोडत आहे. यामुळे हा मजुरवर्ग सैरभैर झाला आहे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्यासाठी मजबूर होत आहे. शासनाच्या धोरणानुसार बांधकाम कामगारसाठी विविध शासकीय योजना उपलब्धकरिता कामगार नोंदणी हा उपक्रम ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात राबविले जात आहे. मात्र ही नोंदणी दाखला मिळण्यासाठी फैजपूर नगरपालिका अशा स्थितीत ही कामगार मजुरांना २०० रुपये सक्तीने आकारत आहे. आधीच आर्थिक स्थितीला सामोरा जात असलेला कामगार मजूर वर्ग यामुळे या शासकीय योजनांना मुकत आहे. शहराच्या परिसरातील यावल, रावेर, सावदा नगरपालिकेत यासाठी निशुल्क दाखला मिळत आहे. महाराष्ट्र शासनाचा निशुल्क जीआर असतानासुद्धा फैजपूर न.पा. प्रशासन कामगार, मजुरांना धारेवर धरीत आहे शासनाने यावल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला आहे. याचा विचार होऊन या कामगार मजुरांची शहर व ग्रामीण भागात घर, पाणीपट्टी व वीजबिल माफ करण्यात यावी. या बाबी शासन दरबारी पाठपुरावा करून केलेली रास्त मागणी पूर्ण करावी अन्यथा २६ जानेवारीपासून हा कामगार मजूर, मिस्त्री वर्ग फैजपूर प्रांत कार्यालयासमोर शांततामय मार्गाने आमरण उपोषणाला सुरुवात करण्याचा इशारा दिला.

Web Title: Worker's laboratory in Phazpur, forgive the waterpot, give hand job to the hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.