पाचोरा तालुक्यातील गाळण येथे सर्पदंशाने मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 19:52 IST2019-08-07T19:51:03+5:302019-08-07T19:52:05+5:30

शेतात पिकावर फवारणीचे काम करीत असताना विषारी साप चावल्याने किरण अशोक पाटील (वय ३२, रा.गाळण बुद्रूक) या मजुराचा मृत्यू झाला.

Worker killed by snake bite at Gailan in Pachora taluka | पाचोरा तालुक्यातील गाळण येथे सर्पदंशाने मजुराचा मृत्यू

पाचोरा तालुक्यातील गाळण येथे सर्पदंशाने मजुराचा मृत्यू

ठळक मुद्देपिकावर फवारणी करताना घडली घटनावैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले मृत घोषित

पाचोरा, जि.जळगाव : शेतात पिकावर फवारणीचे काम करीत असताना विषारी साप चावल्याने किरण अशोक पाटील (वय ३२, रा.गाळण बुद्रूक) या मजुराचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील गाळण बुद्रूक येथे बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
किरण पाटील हा युवक मधुकर श्रावण पाटील यांच्या शेतात मजुरी करतो. तो नेहमीप्रमाणे कामावर गेला. पिकावर फवारणी करीत होता. तेव्हा सकाळी दहाला अति विषारी सापाने दंश केला. त्यास तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात आणले. यादरम्यान त्यास मृत घोषित करण्यात आले. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Worker killed by snake bite at Gailan in Pachora taluka