बंधाऱ्यांची कामे निष्कृष्ट दर्जाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:22 IST2021-08-25T04:22:49+5:302021-08-25T04:22:49+5:30
जळगाव : तिढ्या, मोहमंडली आणि अंधारमळी येथे वनविभागाने बांधलेल्या बंधाऱ्यांची कामे अत्यंत निष्कृष्ट दर्जाची असून त्याची चौकशी करण्यात यावी, ...

बंधाऱ्यांची कामे निष्कृष्ट दर्जाची
जळगाव : तिढ्या, मोहमंडली आणि अंधारमळी येथे वनविभागाने बांधलेल्या बंधाऱ्यांची कामे अत्यंत निष्कृष्ट दर्जाची असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी विधिमंडळ अंदाज समितीकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले की, जळगाव शहरातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणाऱ्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम ठेकेदाराने पूर्ण केले नाही. यामुळे नागरिकांना प्रचंडा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच आदिवासी भागासाठी दिला जाणारा अमृत आहार अनेक गावांना निधीअभावी दिला जात नाही. त्याचबरोबर आदिवासीबहुल क्षेत्रातील रावेल तालुक्यातील निमड्या, चोपडा तालुक्यातील देवझिरी, कर्जाने या गावातील उपकेंद्रांचे बांधकाम नव्याने झाले असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. पावसाळ्यात या इमारतींना गळती लागते. याबाबत नवसंजीवनी बैठकीमध्ये वारंवार तक्रार करूनसुद्धा कुठलीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे याकडे लक्ष द्यावे व तीन हजार मातांना मातृत्व अनुदान तात्काळ द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.