वर्डी ग्रा.पं.च्या महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST2021-09-17T04:22:21+5:302021-09-17T04:22:21+5:30
सदस्यांच्या पतींचे उपोषण चोपडा : वर्डी येथील ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगातून झालेल्या विकासकामांमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाला. या ...

वर्डी ग्रा.पं.च्या महिला
सदस्यांच्या पतींचे उपोषण
चोपडा : वर्डी येथील ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगातून झालेल्या विकासकामांमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाला. या प्रकरणी चौकशी अहवाल मिळावा, यासाठी वर्डी ग्रामपंचायतीच्या दोन महिला सदस्यांच्या पतींनी उपोषण सुरू केले आहे.
दत्तात्रेय विजय पाटील आणि महेंद्र रतिलाल पाटील यांनी शहरातील गजबजलेल्या शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे. दिनांक १६ रोजी दुपारी बारा वाजेपासून आमरण उपोषण सुरू झाले आहे. गावात न झालेल्या कामांचीही बिले काढण्यात आली आहेत. गटारांची लाखो रुपयांची बिले काढण्यात आली आहेत. जोपर्यंत चौकशी अहवाल मिळत नाही किंवा अपहाराबाबत चौकशी होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही, असे दोघांनी सांगितले.
उपोषणकर्त्यांची भेट घेणार
या अपहाराबाबत चौकशी झाली आहे व त्याबाबत उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे समाधान होईल, असे अहवाल त्यांना दिले जातील व उपोषणाची सांगता करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया गटविकास अधिकारी बी.एस. कोसोदे यांनी दिली.