जळगावात ८५ फूट खोल विहिरीत पडलेली विवाहिता बचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 11:38 IST2017-12-09T11:36:03+5:302017-12-09T11:38:50+5:30
विवाहिता म्हणते विहिरीत फेकले तर कुटुंबीय म्हणतात स्वत: उडी मारली

जळगावात ८५ फूट खोल विहिरीत पडलेली विवाहिता बचावली
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.९ : खानावळमध्ये पोळ्या लाटण्याचे काम करणाºया रिझवाना शकील चौधरी (वय ३५, रा.ममुराबाद रोड) ही विवाहिता असोदा रस्त्यावरील ८५ फूट खोल विहिरीत कोसळली. सुदैवाने ती बचावली. काम आटोपून घराकडे परतत असताना दोन जणांनी कालिंकामाता मंदिराजवळून आपले अपहरण करीत रिक्षातून घेऊन जात विहिरीत फेकल्याचा दावा तिने केला आहे. तर विवाहितेच्या पतीने शनिपेठ पोलिसांना ती मनोरुग्ण असून वेडाच्या भरात तिने स्वत: विहिरीत उडी मारली असल्याची माहिती दिली आहे़
सुभाष महाजन यांनी पोलीस पाटील आनंदा बिºहाडे यांना हा प्रकार कळविला़ त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. विवाहिता विहिरीत पडली, बचावासाठी प्रयत्न करीत असताना तिच्या हाताला पाईपला बांधलेली दोरी लागली़ तिचा आधार घेत कपारीला धरून ती कृषिपंप ठेवण्यासाठीच्या फाउंडेशनचा आधार घेतला. रात्रभर ती बसून होती. खाटेच्या साहाय्याने तिला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिने हा प्रकार कसा घडला याबाबत माहिती दिली.