नशिराबादला मृत्यूनंतर महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:04 IST2020-06-18T12:03:50+5:302020-06-18T12:04:08+5:30

नशिराबाद : गावातील सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातील चौपाल मोहल्ला भागातील एका ४७ वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला ...

Woman's report positive after death in Nasirabad | नशिराबादला मृत्यूनंतर महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह

नशिराबादला मृत्यूनंतर महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह

नशिराबाद : गावातील सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातील चौपाल मोहल्ला भागातील एका ४७ वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली. गेल्या पाच दिवसात कोरोना बाधेने पुन्हा हा दुसरा मृत्यू झाल्याने सर्वजण चिंतातूर झाले आहे. आतापर्यंत येथे कोरोना बाधेने तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
या महिलेच्या मृत्यूनंतर तिचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय चव्हाण यांनी दिली.

येथे गेल्या महिन्यात भाजीविक्रेत्या वृध्दाच्या मृत्यू झाला.सुरक्षीत असलेल्या नशिराबादला पुन्हा कोरोनाने शिरकाव केला. १३ रोजी ४९ वर्षीय महिलेचा कोरोनाची बाधा होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.त्यावेळी त्याच्या निकट संपर्कात आलेल्या १३ जणांना क्वॉरंटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एका ४७ वर्षीय महिलेचा बुधवारी सकाळी कोरोना बाधेमुळे मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय चव्हाण यांनी दिली.

Web Title: Woman's report positive after death in Nasirabad