स्वच्छतागृहाचा वापर करणाऱ्या कुंभारी बुद्रुक येथील महिलेला मिळणार दोन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 10:30 PM2017-12-20T22:30:39+5:302017-12-20T22:35:42+5:30

साई सुवर्ण बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कुंभारी येथे स्वच्छता अभियान

The woman who used to use the sanitary toilets, will get two grams of gold mangalasutra | स्वच्छतागृहाचा वापर करणाऱ्या कुंभारी बुद्रुक येथील महिलेला मिळणार दोन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र

स्वच्छतागृहाचा वापर करणाऱ्या कुंभारी बुद्रुक येथील महिलेला मिळणार दोन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र

Next
ठळक मुद्देसाई सुवर्ण संस्थेतर्फे गावात साफसफाई मोहिममहिला स्वच्छतागृहांजवळ लावले एलईडी दिवेविजेत्या महिलेला मिळणार दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र

आॅनलाईन लोकमत
तोंडापूर, जि.जळगाव : संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त कुंभारी बुद्रुक गावात साई सुवर्ण बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.यावेळी नियमित स्वच्छतागृहाचा वापर करणाऱ्या महिलांच्या नावाची चिठ्ठी टाकून प्रत्येक महिन्याला लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. विजेत्या महिलेला दोन ग्रॅम सोन्याचे पॉलिशचे मंगळसूत्र देण्यात येणार आहे.
साई सुवर्ण संस्थेतर्फे बुधवारी गावात साफसफाई करून महिला स्वच्छतागृहाजवळ एलईडी दिवे लावण्यात आले. ज्या महिला नियमित स्वच्छतागृहाचा वापर करतील त्या महिलांसाठी प्रत्येक महिन्याला लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. विजेत्या महिलेला २ ग्रॅम सोन्याचे पॉलिश केलेले मंगळसूत्र संस्थेतर्फे देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष प्रभाकर साळवे यांनी सागितले. यावेळेस सरपंच सुरतसिग जोशी पं.स.सदस्य हिरामण जोशी, पोलीस पाटील विजय जोशी, राजेंद्र किटे, मधुकर साळवे यांच्यासह साई सुवर्ण गु्रपचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: The woman who used to use the sanitary toilets, will get two grams of gold mangalasutra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.