बहिणीच्या सासरच्या मंडळीकडून महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 14:59 IST2020-11-13T14:58:48+5:302020-11-13T14:59:25+5:30
बहिणीच्या सासरच्या मंडळीकडून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहिणीच्या सासरच्या मंडळीकडून महिलेचा विनयभंग
पाचोरा : बहिणीच्या सासरच्या मंडळीकडून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, फिर्यादी महिला कालिका नगर भागात भावाच्या घरात भाडेकरू म्हणून राहते. याच ठिकाणी फिर्यादी महिलेची धाकटी बहीण कौटुंबिक वाद असल्याने तिच्या लहान मुलांसह भावाकडे आलेली होती.
८ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या बहिणीचा मुलगा अंगणात खेळत होता. तेव्हा महिलेच्या बहिणीचा पती भाऊसाहेब दयाराम पाटील, सासरे दयाराम तोताराम पाटील, जेठ शांताराम दयाराम पाटील, चुलत दीर दीपक पाटील सर्व रा.बोदर्डे, ता.भडगाव हे त्यांच्या गाडीतून उतरून भाऊसाहेब पाटील हे त्यांच्या मुलास उचलून नेत होते. तेव्हा फिर्यादी महिलेने पाहिले व त्यास अटकाव केला. याचा राग येत भाऊसाहेब पाटील याने व इतरांनी विनयभंग केला. यावरून या चौघांविरुद्ध पाचोरा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राहुल सोनवणे करीत आहे.