चोरीच्या उद्देशाने आलेल्या तरूणाचा महिलेवर चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 08:55 PM2018-08-19T20:55:01+5:302018-08-19T20:57:06+5:30

चोरीच्या उद्देशाने आलेल्या मनोज शिवाजी चंदेले (वय २२) या तरूणाने शेजारीच राहणाऱ्या प्रतिभा प्रदिप पाटील (वय ४७) या महिलेवर चार वेळेस चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची थरारक घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील शंकर अप्पानगरात घडली़

The woman with the intention of theft is stabbed to death | चोरीच्या उद्देशाने आलेल्या तरूणाचा महिलेवर चाकूने वार

चोरीच्या उद्देशाने आलेल्या तरूणाचा महिलेवर चाकूने वार

Next
ठळक मुद्देपिंप्राळा परिसरातील घटनामहिलेच्या अंगावर चार ठिकाणी वारपोलिसांनी केली संशयित आरोपीला अटक

जळगाव : चोरीच्या उद्देशाने आलेल्या मनोज शिवाजी चंदेले (वय २२) या तरूणाने शेजारीच राहणाऱ्या प्रतिभा प्रदिप पाटील (वय ४७) या महिलेवर चार वेळेस चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची थरारक घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील शंकर अप्पानगरात घडली़ या महिलेवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर तरूणास रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती नातेवाईकांनी दिली़
महिलेच्या पतीने व प्रत्यक्षदर्क्षींनी दिलेली माहिती अशी की, पिंप्राळा परिसरातील शंकरअप्पा नगरात प्रदिप पाटील हे पत्नी प्रतिभा यांच्यासह वास्तव्यास आहेत़ दरम्यान, शहरात त्यांचे निर्मल अ‍ॅग्रो एजन्सी म्हणून भागीदारीत दुकान आहे़ त्यांना एक मुलगा असून तो नाशिक येथे शिक्षण घेत आहे़
प्रदिप पाटील हे नेहमीप्रमाणे सकाळपासून दुकानावर गेले़ त्यामुळे पत्नी प्रतिभा ह्या एकट्याच होत्या़ सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शेजारी राहणारा मनोज शिवाजी चंदेले हा पाटील यांच्या घरी आला़ त्यावेळी त्याने प्रतिभा यांच्या गळ्यातील मंगळपोत ओढण्याचा प्रयत्न केला़ यात दोघांमध्ये झटापटी होत असताना त्याने महिलेच्या गळ्यावर, पाठीवर तसेच पोटावर वार केले़ ही महिला गंभीररित्या जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळल्या़
चाकू हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शस्त्रक्रिया सुरू होती़ दरम्यान, पाठीत चाकू भोसकल्यामुळे गंभीर इजा झाली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली़ दरम्यान, पोलिसांकडून पाटील कुटूंबीयांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते़ या प्रकरणाबाबत रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलीस ठाण्यात प्रदिप पाटील यांच्या फिर्यादीवरून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मनोज चंदेले याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी मनोजला केली अटक
चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मनोज याचा शोध घेतला़ तो घरातच मिळून आल्यानंतर त्यास पोलिसांनी अटक केली आहे़ दरम्यान,जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुनील गायकवाड यांनी देखील रूग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेत घटनेची माहिती घेतली़
रहिवाशांनी तोडला दरवाजा
झटापटी होत असताना प्रतिभा यांचा आवाज आजुबाजुच्या रहिवाशांना आला़ त्यामुळे शेजारच्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली़ दार आतून बंद असल्यामुळे शेजारच्यांनी दरवाजा तोडत आत प्रवेश केला़ यावेळी त्यांना मनोज हा त्याठिकाणी बसलेला तर प्रतिभा पाटील या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या़ त्वरीत घटनेची माहिती प्रदिप पाटील यांना देत महिलेला खाजगी रूग्णालयात उपचारार्थ वाहनातून नेले़ या घटनेत महिलेच्या गळ्यातील मंगळपोत देखील तुटलेली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली़

Web Title: The woman with the intention of theft is stabbed to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.