त्या महिलेचा अखेर मृत्यू; पतीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST2021-06-28T04:13:29+5:302021-06-28T04:13:29+5:30
जळगाव : पतीच्या छळाला कंटाळून जाळून घेतलेल्या उज्ज्वला संजय पाटील (वय ४५, रा. मेहरुण) यांचा शनिवारी उपचार सुरू असताना ...

त्या महिलेचा अखेर मृत्यू; पतीला अटक
जळगाव : पतीच्या छळाला कंटाळून जाळून घेतलेल्या उज्ज्वला संजय पाटील (वय ४५, रा. मेहरुण) यांचा शनिवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात पती संजय पंडित पाटील याच्याविरुद्ध रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
उज्ज्वला पाटील (लाडवंजारी) यांनी २४ रोजी रात्री ८ वाजता घरात ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून स्वत:ला जाळून घेतले होते. यात त्या ७० टक्के भाजल्या होत्या. जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना गोदावरी रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांचा शनिवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. उज्ज्वला यांचा भाऊ चेतन प्रकाश लाड (रा. चिंचोली, ता. जळगाव) यांनी रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संजय पाटील यांच्याविरुध्द तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली. घटनेच्या दिवशी संजय पाटील याने पत्नीकडे माहेरून पाच हजार रुपये आणण्यासाठी छळ केला होता.