वीज जोडणीसाठी एक खिडकी योजना सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:50 PM2019-08-26T12:50:19+5:302019-08-26T12:51:01+5:30

जळगाव : महावितरणतर्फे गणेश मंडळांना अल्पदरात वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येणार असून, गणेश मंडळाच्या सोयीसाठी आजपासून ‘एक खिडकी ...

 A window plan for the electricity connection has begun | वीज जोडणीसाठी एक खिडकी योजना सुरु

वीज जोडणीसाठी एक खिडकी योजना सुरु

Next

जळगाव : महावितरणतर्फे गणेश मंडळांना अल्पदरात वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येणार असून, गणेश मंडळाच्या सोयीसाठी आजपासून ‘एक खिडकी योजना’ ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. या ठिकाणी अर्ज केल्यावर अवघ्या २४ तासात गणेश मंडळांना वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पुढील आठवड्यात लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून, यासाठी शहरातील विविध श्री गणेश मंडळांतर्फे सजवाटीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. महावितरणतर्फे मंडळांना यंदाही सवलतीच्या दरात वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येणार असून विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे वीज पुरवठा घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. वीज पुरवठा घेण्यासाठी संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या परिसरातील कुठल्याही शाखा कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. तर येत्या दोन दिवसात मडळांच्या सोयीसाठी पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे ‘एक खिडकी योजना’ सुरु करण्यात येणार आहे. अर्ज केल्यानंतर २४ तासात महावितरणतर्फे संबंधित मंडळांच्या ठिकाणी तात्पुरते मीटर बसवुन देण्यात येणार आहे.
अपघात विरहीत उत्सवासाठी गणेश मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शनच घ्यावे, तसेच मंडप व देखाव्यांची उभारणी करताना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखण्याची खबरदारी घेण्या संदर्भात महावितरणचे कर्मचारी शहरातील विविध मंडळाच्या पदाधिकाºयांशी संवाद साधत आहेत. तसेच अनाधिकृत वीज वापरामुळे घडणाºया अनुचित घटने संबंधीत मंडळ व अनाधिकृत वीज पुरवठादारच जबाबदार राहणार असल्याच्या सूचनाही करण्यात येत आहेत.

Web Title:  A window plan for the electricity connection has begun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.