Maharashtra Election 2019 : सेनेसमोर भाजपची बंडखोरी काय चमत्कार घडविणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 05:39 AM2019-10-19T05:39:30+5:302019-10-19T07:07:16+5:30

सेनेच्या जिल्हाप्रमुखांना राष्टÑवादीचा पाठिंबा । बंडखोरांवर कारवाई होत नसल्याने सारेच चिंतेत, बसपाने उतरविले ११ उमेदवार

Will the BJP's rebellion against the Sena work wonders? | Maharashtra Election 2019 : सेनेसमोर भाजपची बंडखोरी काय चमत्कार घडविणार?

Maharashtra Election 2019 : सेनेसमोर भाजपची बंडखोरी काय चमत्कार घडविणार?

Next

जळगाव जिल्ह्यात ११ जागांसाठी तब्बल १०० उमेदवार आपले भविष्य आजमावित आहेत. जिल्ह्यात भाजपचे सात तर शिवसेनेचे $४ असे युतीचे ११ उमेदवार आहेत. युती असली तरी शिवसेनेच्या उमेदवारांसमोर भाजपचे बंडखोर उमेदवार उभे आहेत. भाजपच्या या बंडखोरांमुळे शिवसेना उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. ही बंडखोरी काय चमत्कार घडविते, याकडे लक्ष लागून आहे.
चार ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. तिथे भाजपचे बंडखोर समोर उभे आहेत. त्यामुळे ही बंडखोरी भाजप प्रायोजित असल्याची चर्चाही रंगू लागली आहे.
मुक्ताईनगर मतदार संघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देऊन राष्टÑवादीने धमाल उडवून दिली. हे करताना आपल्या जिल्हाध्यक्षांना अर्ज मागे घ्यायला सांगण्यात आले. यावरुन हे सर्व ठरवून केल्याचे खुद्द शरद पवार यांनी सांगून एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत.
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात काट्याची ट्क्कर होत आहे. यात मतदार संघात राष्टÑवादीतर्फे संजय गरुड हे रिंगणात आहेत, तर या पक्षाचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी जैन संघाच्या एका कार्यक्रमात गिरीश महाजन यांना आपले आशिर्वाद द्यावेत, म्हणून विनंती केली. यातून आता अनेक अर्थ काढले जात आहेत.
इकडे चोपडा मतदार संघात शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील आणि माजी महिला जिल्हाप्रमुख इंदिराताई पाटील यांची दोन दिवसापूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध या दोघांनी प्रचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
शिवसेनेने कारवाई केली पण पंतप्रधान मोदी यांच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या बंडखोरांकडे लक्ष देऊ नका, असे सांगत, कारवाई टाळली आहे. त्यामुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. दुसरीकडे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना एकाचवेळी भाजप बंडखोर, राष्टÑवादी बंडखोर यांच्याशी लढत द्यावी लागत आहे.
जिल्ह्यात ३४ लाख ४७ हजार १८४ मतदार आहेत. जिल्ह्यात बसपा या एकमेव पक्षाने ११ ठिकाणी ११ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्याखालोखाल राष्टÑवादी काँग्रेसचे नऊ तर काँग्रेसचे एकमेव उमेदवार नशिब आजमवित आहेत.

रंगतदार लढती
मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांच्यासमोर जामनेर मतदार संघातून राष्टÑवादी काँग्रेसचे संजय गरुड यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे महाजन हे गेल्या काही दिवसापासून जामनेरात तळ ठोकून असल्याची चर्चा राष्टÑवादी काँग्रेसकडून पसरवली जात आहे.
एरंडोलमध्ये चुरशीची निवडणूक होत आहे. गेल्यावेळी इथे राष्टÑवादी काँँग्रेसचे डॉ. सतीश पाटील हे निवडून आले होते. आता तिथे त्यांची लढत शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांच्याशी होत आहे.

Web Title: Will the BJP's rebellion against the Sena work wonders?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.