भाजपा ‘वाल्यां’चा पक्ष करणार का?, खडसे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 06:01 IST2018-12-08T06:01:11+5:302018-12-08T06:01:24+5:30

भाजपात वाल्या आला तरी त्याचा आम्ही वाल्मिकी करू, असे पक्षश्रेष्ठी म्हणत आहेत.

Will the BJP favor 'Waleen', Khadse's question? | भाजपा ‘वाल्यां’चा पक्ष करणार का?, खडसे यांचा सवाल

भाजपा ‘वाल्यां’चा पक्ष करणार का?, खडसे यांचा सवाल

भुसावळ (जि. जळगाव) : भाजपात वाल्या आला तरी त्याचा आम्ही वाल्मिकी करू, असे पक्षश्रेष्ठी म्हणत आहेत. पक्षविस्तारासाठी करावं लागतं, असे सांगितले जाते. मात्र वाल्याचे वाल्मिकी करताना पक्षच ‘वाल्या’चा होऊ नये, अशी कोपरखळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या स्वकीयांना मारली आहे.
सत्तेसाठी जे इकडे-तिकडे करतात ते लाचार असतात. मी कुणाच्या पुढे-पुढे करणारा नाही. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. मात्र धुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात माझे छायाचित्र टाकले तर मते मिळणार नाहीत, अशी भीती त्यांना असावी. त्यामुळे छायाचित्र टाकले नसावे, असे त्यांनी सांगितले. समय बडा बलवान होता है. मी पक्षासाठी आयुष्यभर झिजत आलो आहे. रामालाही १४ वर्षे वनवासात जावे लागले होते. मी तर सामान्य माणूस आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे आपण वाती तयार करीत आहोत. पण ही वात उजेडही देते आणि प्रसंगी सारेच पेटवून टाकते, असेही ते म्हणाले.

Web Title: Will the BJP favor 'Waleen', Khadse's question?