पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब भालेराव मुसळी फाट्यावरील कंपनीत रोजंदारीवर कामाला होते. १२ सप्टेंबर रोजी ते सायंकाळी सहा वाजता घरातून बाहेर पडले. जाण्याआधी त्यांनी पत्नीला स्वयंपाक बनवायला लावला. बराच वेळ झाला तरी पती आले नाहीत म्हणून त्यांचा गावात शोध घेतला. ते मिळून आले नाहीत. दुसऱ्या दिवशी सोमवारी धरणगाव पोलिसांत पत्नी शीतल यांनी हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतरही पत्नी, मुले व इतर नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरूच ठेवला. मंगळवारी सकाळी गावकऱ्यांनी शिवारातील विहिरी पाहण्यास सुरुवात केली असता ते गावानजीकच्या विहिरीत तरंगत होते. गावकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात आणला. पाळधी दूरक्षेत्राचे हवालदार अरुण निकुंभ व किशोर चंदनकर यांनी पंचनामा केला. भालेराव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याबाबत पाळधी दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पत्नीला स्वयंपाकाला लावले, दुसरीकडे पतीने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST