फैजपूर येथे शिक्षक पतीकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 16:16 IST2018-11-28T16:15:26+5:302018-11-28T16:16:54+5:30

फैजपूर येथील एका २७ वर्षीय विवाहितेचा सात लाखांच्या हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी शिक्षक पतीसह नऊ जणांविरुद्ध छळणे व मारहाणीच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Wife torture for dowry from teacher husband at Fazpur | फैजपूर येथे शिक्षक पतीकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ

फैजपूर येथे शिक्षक पतीकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ

ठळक मुद्देशिक्षक पतीसह नऊ जणांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखलघराचे कर्ज फेडण्यासाठी सात लाख रुपये आणण्याची केली होती मागणीशिवीगाळ करीत मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : फैजपूर येथील एका २७ वर्षीय विवाहितेचा सात लाखांच्या हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी शिक्षक पतीसह नऊ जणांविरुद्ध छळणे व मारहाणीच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दि.३१ मे २०१७ ते ४ एप्रिल २०१८ दरम्यान फैजपूर येथील विवाहितेचा शिक्षक पती विजेंद्र प्रकाश सोनार, प्रकाश सोनार (सासरे), रजनी प्रकाश सोनार (सासू), सचिन सोनार (जेठ), नम्रता सोनार (जेठाणी), जितेंद्र सोनार (जेठ), सोनिया सोनार (जेठानी), नीलेश सोनार (जेठ), मनीषा सोनार (जेठाणी) सर्व रा.शिवाजी नगर व खुशालभाऊ रोड, फैजपूर या सर्वांनी विवाहितेला घराचे कर्जाचे पैसे भरण्यासाठी दोन लाख माहेरून आणावे यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर ही विवाहिता पतीसोबत नांदावयास तयार असतानासुद्धा कोर्टाकडून नोटीस का पाठवली म्हणून जेठ सचिन सोनार याने माहेरून पैसे आणल्यावरच तुला वागवू, असे म्हणत पुन्हा शिवीगाळ करीत मानसिक व शारीरिक छळ केला. या नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि दत्तात्रय निकम व पी. एस.आय. आधार निकुभे करीत आहे.

Web Title: Wife torture for dowry from teacher husband at Fazpur