विधवा महिलेच्या मंजुर घरकुलाचे अनुदान थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:41+5:302021-06-02T04:14:41+5:30

यासंदर्भात प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील मनवेल येथील मंगलाबाई रामदास इंधाटे ...

Widow's sanctioned household grant stopped | विधवा महिलेच्या मंजुर घरकुलाचे अनुदान थांबविले

विधवा महिलेच्या मंजुर घरकुलाचे अनुदान थांबविले

यासंदर्भात प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील मनवेल येथील मंगलाबाई रामदास इंधाटे या विधवा व निराधार महिलेचे रमाई या योजनेअंतर्गत घरकूल मंजूर झाले असून घरकुलाचे बांधकाम अर्ध्यावर आलेले असताना ग्रामपंचायतीने उर्वरित मिळणारे अनुदान रूपाचे हफ्ते थांबविल्याने हे काम बंद करण्यात आले आहे. याबाबत मंगला सोनवणे या महिलेने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महामंत्री जगन सोनवणे यांच्याकडे आपल्याला घरकुलांचे उर्वरित हफ्ते व ग्रामपंचायतीने काम बंद पाडल्याची तक्रार केल्याने आज सोनवणे यांनी यावल येथे पंचायत समितीच्या कार्यालयात निवेदन दिले आहे.

या महिलेचे उर्वरित हफ्ते व बांधकाम सुरू न झाल्यास दिनांक ४ जून रोजी विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करणार असून दि. ७ जून रोजी दुपारी २ वाजता यावल पंचायत समितीसमोर हल्लाबोल आंदोलन व दिनांक १० जून रोजी बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी जगन सोनवणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: Widow's sanctioned household grant stopped