शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

का होतात शाळकरी मुलं हिंसक ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:39 PM

गेल्या सहा-सात महिन्यांत जळगावमध्ये शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हिंसासाराच्या, हाणामारीच्या इतक्या घटना घडल्या आहे की, पालकांसह शिक्षकही हादरून गेले ...

गेल्या सहा-सात महिन्यांत जळगावमध्ये शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हिंसासाराच्या, हाणामारीच्या इतक्या घटना घडल्या आहे की, पालकांसह शिक्षकही हादरून गेले आहेत़ विशेष म्हणजे मित्र मैत्रीणींसह शिक्षकांवर थंड डोक्याने हल्ला करणाऱ्यांची संख्या दिवसागणीक वाढतेय व त्यात स्मार्ट फोनचा हात खूप मोठया प्रमाणावर आहे हे वास्तव पोलिसांनिही मान्य केले आहे़ हल्ला करणारी हाणामारीपर्यंत पोहचत शिक्षकांना दुखापत करणारी ही मुले एवढी हिंसक कशी होत आहेत? काय कारण असतील या विस्कटलेल्या मनांमागे शिक्षणतज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांनी या निमित्ताने पौंगडावस्थेतील मुलांच्या मनस्थितीवर आणि एकंदरच समाजावर प्रकाश टाकला पाहिजे़ पण गोंधळलेली ही 'मिनी अ‍ॅडल्ट' मुले जी अविचारी कृत्य करून बसताय त्यामागे त्यांचे आसुललेले बालपण हे कारण आहे की पौंगडवस्थेत येण्याचे मुलामुलींचे वय आता खूपच खाली येत चालले आहे, हे खरं कारण आहे़ की मुलांच्या जीवनातील एकाकीपणा वाढलेला आहे हे त्या मागच खर कारण आहे? एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे की, शालेय मुलं अतिशय आत्मकेंद्री बनत आहेत, त्यांचे सुख, त्यांच्या इच्छा, त्यांच्या (प्रेमप्रकरणांच्या) समस्या, त्यांच्या तृप्ती यात ती इतकी बुडून गेली की, त्यांना आपल्या पलीकडचे जग, इतरांची सुख:दुख, इतरांच्या गरजा याचे जराही महत्त्व वाटत नाही़ आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दुसºयाविषयी काही भावनाच न उरल्याने ती हिंसक बनत सरळ शिक्षकांवरच (प्रसंगी आई वडिलांवर) हल्ला करत आहे़ जी बाब खरच चिंताजनक आहे़- चंद्रकांत भंडारी, शिक्षण समन्वयक

टॅग्स :Jalgaonजळगाव