दुर्गंधी पसरलेल्या गावात स्वच्छतेचा फलक कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 21:51 IST2019-12-08T21:51:47+5:302019-12-08T21:51:56+5:30
चाळीसगाव : तालुक्यातील बोढरे येथे ग्रामस्थ उघड्यावर शौचास बसतात त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली जाते. तरीदेखील जिल्हा परिषदेने बोढरे गावाची ...

दुर्गंधी पसरलेल्या गावात स्वच्छतेचा फलक कशाला?
चाळीसगाव : तालुक्यातील बोढरे येथे ग्रामस्थ उघड्यावर शौचास बसतात त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली जाते. तरीदेखील जिल्हा परिषदेने बोढरे गावाची स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निवड करुन हगणदारी मुक्त गाव म्हणून कोणत्या निकषाद्वारे निवड केली, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित करुन हा स्वच्छ व हगणदारीमुक्त गाव असा लावलेला फलक त्वरीत हटवावा, अशी मागणी गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्याकडे ५ रोजी केली आहे.
जिल्हा परिषदेतर्फे बोढरे गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छ व हगणदारीमुक्त गावात आपले सहर्ष स्वागत’ असा फलक लावण्यात आलेला आहे. स्वच्छ भारत मिशन या योजनेस हे गाव कदाचित अपवाद असेल. कारण या गावाच्या मुख्य प्रवेशद्वारातून गावात जाताना रस्त्यांवर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दुगंर्धी आहे. ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या आवारात उघड्यावर गावकरी शौचालयास बसतात.
अशी अस्वच्छतादर्शक स्थिती असताना कोणत्या निकषावर जिल्हा परिषदेने हगणदारी मुक्त गाव म्हणून जाहिर करुन फलक उभारण्यात आला आहे. त्यामुळे गावात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.