तिसऱ्या लाटेला निमंत्रण कशामुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:37+5:302021-09-08T04:21:37+5:30
- शासकीय रुग्णालयात फिजिकल डिस्टन्सिंग हा प्रकारच नाही. या ठिकाणी रोज ओपीडीत प्रचंड गर्दी असते. गंभीर बाब म्हणजे अनेक ...

तिसऱ्या लाटेला निमंत्रण कशामुळे
- शासकीय रुग्णालयात फिजिकल डिस्टन्सिंग हा प्रकारच नाही. या ठिकाणी रोज ओपीडीत प्रचंड गर्दी असते. गंभीर बाब म्हणजे अनेक जण विनामास्क, तर काही जण चुकीच्या पद्धतीने मास्क परिधान करून आलेले असतात. हे रुग्णालय कोविडचे सुपर स्प्रेडर ठरू शकते.
- शासकीय कार्यालयांतील नियमांमध्येही शिथिलता आली आहे. कितीही लोक कोणत्याही वेळी बिनधास्त प्रवेश करू शकतात. जिपमध्ये नोंद करण्यासाठी टेबल व कर्मचारी असले तरी स्वत:हून कोणी तपासणी केली तरच या ठिकाणी तपासणी होते.
- ग्रामीण भागात तपासण्या अगदी कमी प्रमाणात होत आहेत. अनेक आजारी लोक तपासण्या करीतच नाही.
- नागरिकांनी आता एकमेकांना भेटताना बिनधास्तपणे हातात हात घ्यायला सुरुवात केली आहे. जे मध्यंतरी टाळले जात होते.
कधीही येऊ शकते तिसरी लाट : जिल्हा शल्यचिकित्सक
बाहेरील जिल्ह्यांत रुग्णवाढ समोर आली आहे. तिसऱ्या लाटेची वातावरण निर्मिती झाली आहे. जळगावात यापुढे कधीही रुग्णवाढ होऊ शकते. नागरिकांनी शासनाने घालून दिलेले नियम पाळले नाहीत तर धोका आहे. त्यामुळे मास्क परिधान करणे, हातात हात न घेणे, स्वच्छता ठेवणे आदी नियम पाळून आपण धोका कमी करू शकतो. दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक रुग्ण आढळले तरी प्रशासनाची त्या दृष्टीने पूर्ण सज्जता आहे.
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
अशा होत्या दोनही लाटा
- पहिली लाट मे पासून सुरू होऊन सप्टेंबरपर्यंत होती.
- ऑक्टोबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत रुग्ण कमी होते.
- १५ फेब्रुवारीपासून मे पर्यंत लाट
- मे महिन्यापासून लाट ओसरायला सुरुवात
- १६ जुलैपासून प्रतिदिवशी १० पेक्षा कमी रुग्णांची नोंद
- ऑगस्ट २०२१ मध्ये निम्मे तालुके शून्यावर