मुलीवर प्रेम का करतो? म्हणत केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:18 IST2021-03-01T04:18:09+5:302021-03-01T04:18:09+5:30
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे शनिवारी रात्री दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी रविवारी दोन्ही गटाच्या ११ जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात ...

मुलीवर प्रेम का करतो? म्हणत केली मारहाण
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे शनिवारी रात्री दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी रविवारी दोन्ही गटाच्या ११ जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
अक्षय भास्कर सोनवणे तर दुसऱ्या गटातील भूषण उर्फ जीवन सुखदेव ठाकरे, अक्षय दीपक जाधव व आकाश ज्ञानदेव डोळे या चौघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, एका गटातील तरुण मुलीवर प्रेम का करतो? या कारणावरून वादाची ठिणगी पडली आहे.
अक्षय भास्कर सोनवणे याच्या फिर्यादीवरून शुभम कोळी, दीपक कोळी, भूषण उर्फ जीवन सुखदेव ठाकरे, संतोष उर्फ बब्या सुभाष कोळी, अक्षय दीपक जाधव, आकाश ज्ञानदेव डोळे, भिकन कोळी यांच्यासह इतर चार जणांविरुध्द तर दुसऱ्या गटाचा दीपक उर्फ नीलेश गोपाळ कोळी याच्या फिर्यादीवरून अक्षय भास्कर सोनवणे, भास्कर शंकर सोनवणे व अनोळखी दोन अशा चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत लाठ्या, काठ्या, स्टंम्प, फावडे व दगडांचा वापर झाला आहे. तपासाधिकारी अमोल मोरे यांनी चारही जणांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.