नाही सांगितले तरी गल्लीतून का जाता? डोक्यात सळईच हाणली!

By विजय.सैतवाल | Updated: September 25, 2023 15:44 IST2023-09-25T15:44:13+5:302023-09-25T15:44:42+5:30

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Why do you go through the street even if you say no? Hit in the head! | नाही सांगितले तरी गल्लीतून का जाता? डोक्यात सळईच हाणली!

नाही सांगितले तरी गल्लीतून का जाता? डोक्यात सळईच हाणली!

जळगाव : गल्लीतून जाण्यास नाही सांगितले तरी का जातात?, असा जाब विचारत शेखर प्रेमराज डोळे (३०) व त्यांचा मामे भाऊ राजू सोनवणे यांना चार जणांनी मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली. त्यावरून चौघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी तालुक्यातील पळसोद येथे घडली.

शेखर डोळे व राजू सोनवणे हे दोघे जण रस्त्याने जात असताना त्यांना दोघांनी हटकले व तुम्हाला गल्लीतून जायचे नाही सांगितले तरी का जातात, तुम्हाला समजत नाही का? असा जाब विचारला. त्यावेळी शेखर व राजू यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला.

मात्र दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करीत शेखरच्या डोक्यात सळईने वार केला. तसेच अन्य दोघांनी मारहाण केली. या प्रकरणी शेखर डोळे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चौघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित करीत आहेत.

Web Title: Why do you go through the street even if you say no? Hit in the head!