माझ्या गच्चीवर का जाता म्हणत तरुणाला घेतला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:19 IST2021-06-09T04:19:44+5:302021-06-09T04:19:44+5:30

जळगाव : माझ्या गच्चीवर का जाता या कारणावरून अनिल पंडित तायडे (३३, रा.लक्ष्मीनगर) या तरुणाच्या हाताला एकाने चावा घेऊन ...

Why did you go to my terrace and bite the young man | माझ्या गच्चीवर का जाता म्हणत तरुणाला घेतला चावा

माझ्या गच्चीवर का जाता म्हणत तरुणाला घेतला चावा

जळगाव : माझ्या गच्चीवर का जाता या कारणावरून अनिल पंडित तायडे (३३, रा.लक्ष्मीनगर) या तरुणाच्या हाताला एकाने चावा घेऊन जखमी केले. ही घटना सावखेडा बुद्रुक येथील मानसिंगनगरात सोमवारी सकाळी १० वाजता घडली. याप्रकरणी चैत्राम न्हाळदे (रा. मानसिंगनगर, सावखेडा बुद्रुक) यांच्याविरुध्द तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल तायडे हे लक्ष्मीनगरातील रहिवासी आहेत. सोमवारी सकाळी ते सावखेडा बुद्रुक येथील मानसिंगनगरात राहणारे मामा मोहन रंधे यांच्याकडे आले होते. दरम्यान, रंधे यांच्या घरासमोरील रहिवासी चैैत्राम न्हाळदे याने माझ्या गच्चीवर का जाता या कारणावरून अनिल यांच्याशी वाद घालून त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला चावा घेतला. हा प्रकार समजल्यानंतर अनिल यांचे मामेभाऊ गिरीश रंधे व मामी गीता रंधे यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्हाळदे याने दोघांना लाकडी दांड्याने मारहाण केली. अनिल तायडे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Why did you go to my terrace and bite the young man