कुजबूज प्रादेशिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST2021-07-03T04:11:52+5:302021-07-03T04:11:52+5:30
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेर पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करीत केलेल्या उपोषणाचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याची ...

कुजबूज प्रादेशिक
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेर पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करीत केलेल्या उपोषणाचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याची शहरातच नव्हे तर तालुक्यात चर्चा आहे. याठिकाणी गेल्या काही वर्षांपासून एकाच राजकीय पक्षाची सत्ता असल्याने कर्मचारी, अधिकारी सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेत संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करीत असल्याची तक्रार उपोषणकर्त्यांनी केली होती. याचबरोबर सिंचन विहीर व इतर शासकीय योजनांचे लाभ सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना मिळत असल्याने विरोधक अस्वस्थ होणे साहजिक आहे. राज्यात सत्ताधारी असूनही आपल्या कार्यकर्त्यांना योजनांचा लाभ मिळवून देता येत नसल्याचे शल्य त्यांना बोचत होते. पंचायत समितीतील काही कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून असल्याने त्यांचेवर कुणाचातरी राजकीय वरदहस्त असलाच पाहिजे. खरे तर सत्ताधाऱ्यांपैकी काही सदस्य देखील या प्रकाराला कंटाळे होते, यातूनच सत्ताधारी सदस्यने राजीनामा दिला. मध्यंतरी एका पदाधिकाऱ्याने सिंचन विहिरींच्या वाटपात विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करून सत्ताधाऱ्यांना
घरचा आहेर दिला होता. राष्ट्रवादीने आक्रमक होत उपोषणाचे पाऊल उचलून मोठी चपराक दिली आहे. जिल्हा परिषदेने चौकशी समिती नेमून चौकशी अहवाल मागवून कारवाईचे आश्वासन दिले आहे. चौकशी समितीकडून आता राजकीय दबाब विरहित चौकशीची अपेक्षा असून दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, असे सामान्य नागरिक बोलताना दिसत आहे.
- मोहन सारस्वत, जामनेर