कुजबूज प्रादेशिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST2021-06-28T04:13:08+5:302021-06-28T04:13:08+5:30

सर्वत्र काँग्रेस स्वबळावर लढण्याची भाषा करून राज्यात खळबळ माजवून देणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी ना ना करत ...

Whisper regional | कुजबूज प्रादेशिक

कुजबूज प्रादेशिक

सर्वत्र काँग्रेस स्वबळावर लढण्याची भाषा करून राज्यात खळबळ माजवून देणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी ना ना करत अमळनेरात स्वबळाला पद्धतशीर फाटा दिला. २२ नगरसेवकांच्या बचावासाठी भाजपच्या व्यासपीठावर जाऊन देखील होय मी राष्ट्रवादीच ! म्हणणारे माजी आमदार साहेबराव पाटील यांना नुकतेच पटोले हे अमळनेरात आले असता काँग्रेसने व्यासपीठावर बोलावले होते.

तब्बल तीन तास उशिराने काँग्रेसची सभा सुरू झाल्याने सरळ नाना पटोले यांना बोलण्यासाठी माईकजवळ बोलावण्यात आले. तत्पूर्वी नगरसेवक तथा शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी व्यासपीठावरील माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याबाबत नानांना काही तरी सांगितले आणि तद्नंतर भाषणात अनेकवेळा नाना पटोले यांनी साहेबरावांच्या नावाचा उल्लेख करत त्यांना सोबत घेऊन चला, सर्वांना सोबत घेऊन आगामी विविध निवडणुका लढायचे वक्तव्य केल्याने उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. कदाचित शे दोनशेच्या सभेत बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांचीच संख्या जास्त असल्याने पटोलेनी स्वबळाला ना ना केली असेल. सभा सुरू होण्यापूर्वी आमदार अनिल पाटील यांनीदेखील भेट देऊन काँग्रेसच्या शक्तीची चाचपणी केली, असेही बोलले जात होते. त्यात दररोज आमदारांच्या कार्यालयात येऊन आम्ही तुमचे भक्त म्हणवणारे भालदार चोपदार चांगलेच दचकलेले दिसत होते.

-संजय पाटील

Web Title: Whisper regional