क्रिकेट खेळताना वकिलावर काळाने घातली झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 16:10 IST2021-03-13T16:09:51+5:302021-03-13T16:10:30+5:30
नामांकित वकील ॲड. दिलीप रावतोळे (४८) यांना क्रिकेट खेळत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

क्रिकेट खेळताना वकिलावर काळाने घातली झडप
लोककत न्यूज नेटवर्क
धरणगाव : येथील एलआयसीचे विमा विकास अधिकारी गणेश रावतोळे यांचे लहान बंधू व गुड शेपर्ड इंग्लिश मीडियम स्कुलच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांचे पती, नामांकित वकील ॲड. दिलीप रावतोळे (४८) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. क्रिकेट खेळत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
शहरातील सर्व वकील मित्रांसोबत सकाळी महात्मा फुले हायस्कुलच्या मैदानावर क्रिकेट खेळायला जात असत. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी बॅटिंग करत असताना रावतोळे अचानक खाली कोसळले. सर्व मित्रांनी शर्थीचे प्रयत्न करून ग्रामीण रुग्णालय, धरणगाव येथे आणले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश बोरसे यांनी तपासले असता हृदयविकाराचा तीव्र झटक्याने प्राणज्योत मालवल्याचे घोषित केले.
तरुण वयात दिलीप रावतोळे गेल्याने धरणगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.