ती कुठे माझी मुलगी... ती तर आहे श्वास माझा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST2021-07-25T04:16:05+5:302021-07-25T04:16:05+5:30

पाचोरा : ‘वडील होण्याइतपत जगात कोणताच प्रचंड आनंद नाही आणि कन्या झाली, तर कोणतंच सुख त्याहून बेधुंद नाही...’ या ...

Where is my daughter ... she is my breath! | ती कुठे माझी मुलगी... ती तर आहे श्वास माझा!

ती कुठे माझी मुलगी... ती तर आहे श्वास माझा!

पाचोरा : ‘वडील होण्याइतपत जगात कोणताच प्रचंड आनंद नाही आणि कन्या झाली, तर कोणतंच सुख त्याहून बेधुंद नाही...’ या काव्यपंक्ती सार्थ ठरवत कन्या जन्माचे सनई-चौघडा लावत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

पाचोरा येथील डॉ. अजित पाटील आणि त्यांच्या पत्नी डॉ. कामिनी पाटील यांना कन्यारत्न प्राप्त झाले. अजित हे पाचोरा येथील तावरे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आर.जी. पाटील यांचे चिरंजीव आहेत. या कुटुंबातील ही पहिली नात असल्यामुळे सनई- चौघडे यांच्या स्वरात आणि फुलांच्या पायघड्या घालत या कन्येचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी या नवजात शिशूला कुटुंबात प्रवेश करताना बघून आजोबा झालेले रवींद्र पाटील आणि आशा पाटील यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले. कन्येचा जन्म अभिशाप मानणाऱ्या संकुचित विचारांसाठी हा एक आदर्शवत धडा आहे, हे मात्र निश्चित!

फोटो

Web Title: Where is my daughter ... she is my breath!