कुठे लॉक तर कुठे अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:56 AM2020-07-10T11:56:06+5:302020-07-10T11:56:21+5:30

जळगाव : लॉकडाऊनचा तिसरा दिवस शहरात संमिश्र राहिला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंग कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी धाब्यावर बसविल्याचे ...

Where locked and where unlocked | कुठे लॉक तर कुठे अनलॉक

कुठे लॉक तर कुठे अनलॉक

Next


जळगाव : लॉकडाऊनचा तिसरा दिवस शहरात संमिश्र राहिला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंग कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी धाब्यावर बसविल्याचे चित्र होते तर रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त हटल्याने वाहनेही सुसाट होती़ त्यामुळे कुठे लॉक कुठे अनलॉक अशी परिस्थिती गुरुवारी शहरात होती़
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे़ किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आलेली आहे़
दुचाकीं, चार चाकींतून अत्यावश्यक सेवा वगळता प्रवासास मनाई असतानाही अनेक रस्त्यांवरून अनेक लोक डबल सीट प्रवास करताना चित्र होते़ काहींना अडवणूक झाली़ मात्र, काहींवर कारवाई न झाल्याने नियम सर्वांना सारखेच असताना अनेकांवर कारवाई होत नसल्याने संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या़ यातून तक्रारीही समोर येत आहेत़ रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या चारशे मीटर अंतरावर असलेल्या जुने भगवान नगर परिसरातील मोकळ्या जागेत, सकाळी फुटबॉल, क्रिकेटचे डाव रंगत असून रात्री या ठिकाणी चक्क बार भरलेला असतो, मात्र, पोलिसांचे याकडे लक्ष नसून एकदाही परिसरात पाहणी झाली नसल्याची तक्रार समोर आली आहे़ त्यामुळे हा कडक लॉकडाऊन केवळ नावालाच का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़

दुचाकी वाहनधारकांसोबत दुजाभाव
-पहिल्या दिवशी विविध चौकांमध्ये पोलीस विचारणा करून वाहने थांबवत होते़ मात्र, तिसºया दिवशी हा बंदोबस्त सैल झाल्याचे चित्र विविध चौकांमध्ये दिसत होते़ चार, चाकी, दुचाकींना कुठलीही विचारणा होत नव्हती, शिवाय काही चौकात बंदोबस्तच नव्हता़
-अनेक ठिकाणी वाहनावरील डबलसीट पती- पत्नीला अडविले जात होते. काहींना सोडले जात होते. त्यामुळे हा एक प्रकारचा दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
-एकाच घरात जर पती- पत्नी शासकीय कार्यालयात नोकरीस असतील तर ते एकाच वाहनावर जाणार पण काही ठिकाणी त्यांची अडवणूक करण्यात आल्याची तक्रारी आहेत.

Web Title: Where locked and where unlocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.