शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जोडीदाराची निवड करताना वेळ देणे महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:24 IST

तरुणाईची मोठी गर्दी : युवा संकल्प अभियान परिषदेतील सूर, तरूणांनी सद्सदविवेकबुध्दीने जगावे

जळगाव : तरुणाईला जीवनात नाक, कान, डोळे जागृत ठेवून चिकित्सकपणे निर्णय घेता आले पाहिजे. त्यासाठी सद्विवेकबुद्धीने तरुणांनी जगावे. तसेच जोडीदाराची निवड करताना पुरेसा वेळ देणेदेखील महत्वाचे आहे, असा सूर जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान परिषदेतून निघाला.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी अ‍ॅड. एस .ए. बाहेती महाविद्यालयात जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. पी. माहुलीकर, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक), राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, परेश शहा (शिंदखेडा), विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. सत्यजित साळवे, जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या राज्य कार्यवाह आरती नाईक, प्राचार्य डॉ. अनिल लोहार व अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे उपस्थित होते. या अभियानाचा समारोप १४ फेब्रुवारी ला कोल्हापुर येथे होणार आहे.अविनाश पाटील यांनी विवाहातील अनिष्ट प्रथा आणि अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी हे अभियान समाज विकासात महत्वाची भूमिका निभावणार असल्याचे सांगितले.समारोपाच्या अध्यक्षस्थानी असलेले अंनिसचे राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी यांनी जोडीदाराची विवेकी निवड आणि मानसिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. परिषदेला जळगाव, धुळे, नंदुरबार येथील विविध महाविद्यालयातील ३०० विद्यार्थी सहभागी झाले. यशस्वितेसाठी गौरव अळणे, प्रधान सचिव अशोक तायडे, अशफाक पिंजारी, विजय लुल्हे, मंजूर पिंजारी, संदीप कुमावत, सायली चौधरी, आर. वाय. चौधरी, दिलीप पाटील, शिरीष चौधरी, हमीद बारेला, कडू पाटील, प्रवीण नागपुरे, गुरुप्रसाद पाटील, पिरन अनुष्ठान, प्रकाश तामसवरे, डॉ. अनिल लोहार, डॉ. खेमराज पाटील यांनी परिश्रम घेतले.जोडीदाराची निवड करताना छंद, आवडीनिवडी विचारात घ्याभावी जोडीदाराची विवेकी पद्धतीने निवड का व कशी करावी याबाबतची प्रथम सत्रात चर्चासत्र घेण्यात आले.यात महेंद्र नाईक, निशा फडतरे व सचिन थिटे यांनी जोडीदाराची निवड करताना छंद, स्वभाव, आवडीनिवडी, विचारधारा यासह विविध विधायक बाबींना महत्व देणे गरजेचे असल्याचे सांगितले. दुसऱ्या सत्रात रूढी परंपरांना फाटा देऊन संघर्षमय पद्धतीने विवाह करणाºया तीन जोडप्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात जळगाव येथील विश्वजीत चौधरी-मिनाक्षी कांबळे, जामनेर तालुक्यातील नेरी येथील आशिष दामोदर-कांचन सोनवणे व औरंगाबाद येथील दीक्षा काळे -आनंद कन्नुर यांचा समावेश होता. या जोडप्यांची कोल्हापूर येथील स्वाती कृष्णात यांनी मुलाखत घेतली.-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.-धुळे, नंदूरबार, जळगावच्या विविध महाविद्यालयातील ३०० विद्यार्थी सहभागी. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव