शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरे यांना शाखेवर जावे लागतेय याच्यापेक्षा दुर्दैव काय?" गुलाबराव पाटील यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 15:20 IST

Gulabrao Patil: उद्धव ठाकरेंना विनामास्क शिवसेनेच्या शाखांवर जावे लागत आहे. हे त्यांच्यासाठी दुर्दैव म्हणावेच लागेल, आदित्य ठाकरे आज निष्ठायात्रा काढत आहेत, हेच काम जर आधी केले असते तर पक्षावर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली

जळगाव - आम्ही शिवसेना सोडली नाही, त्यामुळे आम्हाला आमदारकीचा राजीनामा देण्याची गरजच नाही. आम्ही शिवसेनेचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी काम करत असून, त्यासाठी दिवसरात्र झटून पुढेही काम करत राहू. मात्र, पक्षप्रमुखांनी जे आधी करायला हवे होते ते आता करीत आहेत. उद्धव ठाकरेंना विनामास्क शिवसेनेच्या शाखांवर जावे लागत आहे. हे त्यांच्यासाठी दुर्दैव म्हणावेच लागेल, आदित्य ठाकरे आज निष्ठायात्रा काढत आहेत, हेच काम जर आधी केले असते तर पक्षावर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे युवा सेनेच्या  पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत गुलाबराव पाटील हे बोलत होते. यावेळी राजेंद्र चव्हाण, प्रताप पाटील, शिवराज पाटील यांच्यासह जळगाव व धरणगाव तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा सेनेच्या तालुका व जिल्हा प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून, नव्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.

उद्धव ठाकरे आजारी असल्याने त्यांना जर बाहेर फिरता येत नव्हते तर आदित्य ठाकरे यांनी फिरायला पाहिजे होते. आम्ही तेव्हा हेच सांगायचो. मात्र, तेव्हा ऐकले नाही. आता मात्र शाखेवर जाऊन पक्षाच्या बैठका घेतल्या जात आहेत. ते काम आधीच करणे गरजेचे होते, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.  शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी जिल्ह्यातील सर्व बंडखोर आमदारांना पुन्हा निवडून येऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारले असता, सावंत यांनी आधी ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकून दाखवावी. चार-चार वेळा आमदार राहिलो आहे. जळगाव जिल्ह्यातील ४८ अंशाच्या तापमानात फिरलो आहे, तेव्हा या निवडणुका जिंकता आल्या, हे मुंबईला बसून असलेल्यांना काय कळेल ? असा टोला गुलाबराव पाटील यांनी सावंत यांना लगावला आहे.

दोन दिवस जिल्ह्यातच, पुढे पहाचगेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात नसल्याने अनेकांसोबत चर्चा करता आलेली नाही; मात्र आता दोन दिवस जिल्ह्यातच थांबणार असल्याने अनेकांसोबत चर्चा करायच्या आहेत. तसेच येत्या काळात त्याबाबतचे चित्र दिसेलच असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

रस्त्यांची कामे न करणाऱ्या मक्तेदारावर  फौजदारी गुन्हे दाखल करा-गुलाबराव पाटीलमहापालिकेतील काही नगरसेवक शिंदे गटात आले आहेत. येत्या काळात अजून काही नगरसेवक पक्षात येतील. महापालिकेतील सत्तेपेक्षा आम्हाला जळगाव शहराचा विकास महत्त्वाचा असून, पालकमंत्री असताना शहराच्या विकासासाठी १२० कोटी रुपयांचा निधी दिला आहे; मात्र अजूनही हा निधी खर्च करता आला नसल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली. तसेच शहरातील रस्त्यांच्या कामांना पावसाळ्यानंतर सुरुवात करण्यात येणारच आहे. मात्र, संबंधित मक्तेदाराकडून रस्ते दुरुस्तीचे काम करून घेण्यात यावे; अन्यथा या मक्तेदाराला काळ्या यादीत टाकावे किंवा मग थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना