मुक्ताईनगरातील निवासस्थानी खडसे यांचे औक्षण करून जंगी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2020 15:29 IST2020-10-25T15:29:26+5:302020-10-25T15:29:52+5:30
Eknath Khadse News: खडसे यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सीमोल्लंघन करण्यापूर्वी आपण व जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जात आहे, स्नुषा खा. रक्षा खडसे ह्या भाजपात राहतील असे स्पष्ट केले होते.

मुक्ताईनगरातील निवासस्थानी खडसे यांचे औक्षण करून जंगी स्वागत
मुक्ताईनगर (जि.जळगाव) : भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे मुक्ताईनगर येथील निवासस्थानी रविवारी दुपारी आगमन झाले. त्यावेळी खडसे यांच्या स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचे औक्षण केले. प्रसंगी सासु मंदाकिनी खडसे व कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
खडसे यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सीमोल्लंघन करण्यापूर्वी आपण व जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जात आहे, स्नुषा खा. रक्षा खडसे ह्या भाजपात राहतील असे स्पष्ट केले होते. तर रक्षा खडसे यांनी ही भाजपात राहणार असल्याचे सांगितले होते.
दरम्यान , आजचा प्रसंग बाका होता खडसे यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश आणि घरी भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्याकडून औक्षण करून स्वागत असे चित्र रविवारी दुपारी पहायला मिळाले.