महाजनादेश यात्रेचे बोदवडमध्ये स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 13:22 IST2019-08-24T13:22:29+5:302019-08-24T13:22:49+5:30
बोदवड येथून मलकापूरकडे रवाना

महाजनादेश यात्रेचे बोदवडमध्ये स्वागत
जळगाव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी दुपारी बोदवड येथून मलकापूरकडे रवाना झाली. त्यावेळी रथावर मुख्यमंत्र्यांसह जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे - खेवलकर आदी उपस्थित होते.
बोदवड येथे यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. बोदवड येथील ओडीए योजनेसाठी ४८ लाखाचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्याची माहिती खडसे यांनी दिली.
नाथाभाऊ, गिरीश महाजन आणि मला आपला आशिर्वाद द्या... यात्रेला भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल फडणवीस यांनी आभार मानले. यानंतर तीनही मान्यवरांचे भला मोठा पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
सोबत - व्हीडीओ आणि फोटो- गोपाळ व्यास, बोदवड.