भुसावळात खडसेंचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 12:07 IST2020-10-25T12:06:45+5:302020-10-25T12:07:32+5:30

भुसावळ : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे भुसावळ येथे आगमन झाले. जल्लोषात त्यांचे स्वागत ...

Welcome to Khadse in Bhusawal | भुसावळात खडसेंचे जल्लोषात स्वागत

भुसावळात खडसेंचे जल्लोषात स्वागत


भुसावळ : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे भुसावळ येथे आगमन झाले. जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.
पंचवीस ते तीस वाहनांचा ताफा शहरातील अष्टभुजा देवी मंदिराजवळ दाखल होताच त्यांचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, नगरसेवक उल्हास पगारे, अर्जुन सपकाळे, अशोक चौधरी, नगरसेविका मीनाक्षी धांडे, भागवत सावकारे, पुंडलिक पाटील, दुर्गेश ठाकूर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वागत केले . यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर उपस्थित होत्या.
सर्वांना सोबत घेऊन कामे करणार-खडसे
दरम्यान, येथे नगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. राज्यात महाआघाडीची सत्ता आहे. त्यामुळे सर्वांमध्ये समन्वय घडवून शहराचा विकास करावा लागणार आहे. शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन चालावे लागणार आहे, असे खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: Welcome to Khadse in Bhusawal