गिरीश महाजनांचे मुक्ताईनगरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 23:17 IST2020-11-01T23:17:15+5:302020-11-01T23:17:21+5:30

खडसे यांचे होमपीच असल्याने अनेकांंना वाटले आश्चर्य

Welcome to Girish Mahajan in Muktainagar | गिरीश महाजनांचे मुक्ताईनगरात स्वागत

गिरीश महाजनांचे मुक्ताईनगरात स्वागत

n  लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर :  मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मुक्ताईनगरमार्गे मध्यप्रदेशात जात असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांचे शहरात रविवारी आगमन प्रसंगी भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशा नंतर पाहिल्यानंदाच मुक्ताईनगरात आलेल्या गिरीश महाजन यांच्या स्वागताने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहे.
नेपानागर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.  अशात मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीना प्रचारासाठी बोलविले जात आहे. याच अनुषंगाने माजी मंत्री गिरीश महाजन जामनेर येथून नेपानागर जात होते . वाटेत मुक्ताईनगर लागत असल्याने महाजन रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथे दाखल झाले. याप्रसंगी महाजन याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जि.प. सभापती जयपाल बोडदे, नगरपंचायत भाजपा गटनेते पियुष महाजन नगरसेवक संतोष कोळी, ललित महाजन, मुकेश वानखेडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते सचिन पाटील, विजय कठोके  उपस्थित होते.
 

Web Title: Welcome to Girish Mahajan in Muktainagar